आत्मभान – महिला सबलीकरण डॉ. निर्मला तळपे-झांजरे

डॉ. निर्मला तळपे- झांजरे
शिक्षण-  एम. ए., बि.एड., एम. फिल., पिएच. डी., सेट ( अर्थशास्त्र )
– फर्ग्युसन महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागात २००६ पासून पदवी व पददुत्तर स्तरावर कार्यरत आहेत.
– फर्ग्युसन महाविद्यालयातील सोशल आउट रिच इन  ऐबलीग  सेंटर या सामाजिक जाणीव जागृती उपक्रमाच्या समन्वय
-फर्ग्युसन महाविद्यालयातील इंटरनल कमिटीमधे सेक्रेटरी चा पदावर कार्यरत
– राजश्री शाहू महाविद्यालय लातूर स्वायत्त येथे अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत
-फर्ग्युसन महाविद्यालयातील आय. क्यू. एस. सी. कमिटीमधे सदस्य  म्हणून कार्यरत
– विविध अर्थशास्त्र या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्याने दिलेली आहेत.
– आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर व राज्यस्तरीय चर्चा सत्रांमधे १५ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.
– फर्ग्युसन महाविद्यालय, एम. ई. एस. गरवारे महाविद्यालय, ऐस. पी. कॉलेज, शाहू कॉलेज, नवरोजी वाडिया कॉलेज, सेट मिराज कॉलेज पुणे येथे गुणवत्ता सुधार योजने अंतर्गत व्याख्याने देतात.
– २०१८ ते २०२० या कालावधीस अर्थशास्त्र विभाग प्रमुख  फर्ग्युसन महाविद्यालय ( स्वायत्त ) हे पद भूषविले
Category:

पुस्तकासंबंधी माहिती. महिला सबलीकरण हा एकविसाव्या शतकातील की-वर्ड अर्थात परवलीचा शब्द झाला आहे. महिला सबलीकरणामध्ये स्त्रीला तिचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धीक क्षमतेची जाणीव तिला स्वतःला होणे अपेक्षित आहे. पुरुष श्रेष्ठ आणि स्त्री कनिष्ठ. तिचे समाजातील स्थान दुय्यम आहे. हा विचार समाजमनात खोलवर रुजला आहे. स्त्री-पुरुष विषमतेवर आधारित समान समाजरचनेमध्ये स्त्रीला तिच्या स्वत्वाची जाणीव होण्यासाठी तिचे सबलीकरण होणे आवश्यक आहे. महिला सबलीकरण ही स्त्रीला  स्वयंविकासासाठी प्रवृत्त करणारी निरंतर प्रकिया आहे. स्त्रीला आर्थिक, सामाजिक, नैसर्गिक व सांस्कृतिक दृष्टीने सुदृढ करणे म्हणजे महिला सबलीकरण होय. अशा समर्थ, सबळ झालेली स्त्री कुटुंबामध्ये तसेच सार्वजनिक जीवनातील महत्वाच्या विषयांमध्ये निर्णय घेण्यामध्ये ती सहभागी होणे. तिचे तिचा निर्णयप्रकियेतील सहभाग वाढविणे हे महिला सबलीकरणाचे अंतिम उद्दीष्ट आहे. हे उद्दीष्टपूर्ण करण्यासाठी महिलांचे हक्क व अधिकार याबाबतची माहिती तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सदर पुस्तकामध्ये लिहिलेली आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आत्मभान – महिला सबलीकरण डॉ. निर्मला तळपे-झांजरे”

Your email address will not be published. Required fields are marked *